पारोळा येथून मोटर सायकल चोरी
पारोळा प्रतिनिधी
पारोळा – शहरातील पारगल्ली, पेंढारपुरा येथील सी.बी.शाईन कंपनीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक २५ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत जितेंद्र शालिक महाजन रा.पार गल्ली पेंढारपुरा यांनी फिर्याद दिली की,सी.बी.शाईन कंपनीची एम एच १९ डी एल ७८७५ क्रमांकाची मोटर सायकल २४ रोजी घरासमोर अंगणात लावलेली होती रात्री दोन वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलो असता लावलेल्या जागी मोटर सायकल दिसून न आल्याने आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला असता मोटर सायकल मिळून आली नाही म्हणून याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फौजदार बापू पाटील करीत आहे.