पारोळा शहरात आज रोजी RAF (RAPID ACTION फोर्स व पारोळा पोलीस स्टेशन तर्फे पथसंचलन करण्यात आले आहे,पारोळा पोलीस स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-नगरपालिका-बालाजी महाराज मंदिर-राममंदिर चौक-झपट भवानी चौक-माथा-ते किसान कॉलेज असे पथसंचलन करण्यात आले आहे,किसान कॉलेज येथे संपूर्ण अधिकारी व कर्मचारी प्रिन्सिपल Y. V. पाटील ,प्राध्यापक औजेकर सर,इतर प्राध्यापक वर्ग व कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीं यांना आधुनिक शस्त्रांची सखोल माहिती दिली यांचे उपस्थितीत RAF चे डेप्युटी कमानडंट श्री शशिकांत राय, निरीक्षक संतोष कुमार यादव,निरीक्षक राजकुमार,निरीक्षक बलकारसिंग, निरीक्षक अजयकुमार सिंग 60 RAF चे पुरुष कमांडो कर्मचारी,RAF च्या 5 महिला कमांडो तसेच पारोळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,आसिस्टंट पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड,पोलीस उप निरीक्षक शेखर डोमाले,पोलीस उप निरीक्षण राजू जाधव,22 पोलीस कर्मचारी असे पथसंचलन करन्यात आले असून त्यानंतर एरंडोल शहरात सुद्धा पथसंचलन करण्यात आले आहे,समाजात शांतता रहावी,प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे,कोणीही कायदा हातात घेऊ नये ,कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल कायद्याचा भंग करणारावर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पथसंचलन दरम्यान आवाहन केले आहे.