पारोळा शहरात भटकणारे एकूण 10 संशयितावर पारोळा पोलिसांनी केली प्रतिबंधक कारवाई-
पारोळा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी काही कारण नसताना भटकणारे इसम नामे 1)सोहम रीचू वय 48 वर्ष रा बलदुआ डोंगरी ता खंडवा मध्यप्रदेश 2)मारोती सिदू शिंदे वय 66 वर्ष रा वडगाव कुरूम ता मूर्तिजापूर जि अकोला 3)नारायण दादाराव शिंदे वय 39 वर्ष रा अंजनगाव सुर्जी जी अकोला 4)संजय लक्ष्मण सोळंखे वय 54 वर्ष रा कोळंबी जि अकोला 5) सुभाष लक्ष्मण सोळंखे वय 54 वर्ष रा कोलंबी जि अकोला 6) भाऊराव रामा मांडलकर वय 47 रा परतवाडा जि अमरावती 7) विश्वनाथ किसन तांबे वय 47 वर्ष रा कोळंबी जि अकोला 8) सुरेश लक्ष्मण सोळंखे वय 46 वर्ष रा कोळंबी जि अकोला 9)बाबाराव नाना शिंदे वय 64 वर्ष रा कोळंबी जि अकोला 10)अंबादास रामराव सनिषे वय 40 वर्ष रा दालंबी जि अकोला असे पारोळा शहरात संशयास्पद स्थितीत फिरत आहे अशी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना गोपनीय माहिती मिळालेने लागलीच psi गंभीर शिंदे,पो ना संदीप सातपुते,पो कॉ किशोर भोई,पो कॉ अभिजित पाटील,पो कॉ हेमचंद्र साबे,पो कॉ राहुल पाटील यांनी स
सापडा रचून वरील सर्व संशयित यांना पारोळा शहरातून वेगवेगळे ठिकाणाहून ताब्यात घेतले,व सखोल विचारपूस करता पोलिसांना समाधानकारक उत्तर देत नव्हते म्हणून पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले,उडवाउडवीची उत्तरे देत असलेने वरील सर्व संशयित इसमांची ते राहत असलेले पो स्टे ला त्यांचा डिटेल रिपोर्ट पाठविला व त्यांची गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत का याची माहिती मिळने करीता ” ब” रोल पाठविण्यात आला असून त्यांचे चांगले वागणुकी बाबत पारोळा तहसील कार्यालय येथे पाठवून सर्वांवर 109 crpc अनव्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात सली आहे,त्यामुळे पारोळा शहरात भटकणारांचे धाबे दणाणून गेले असून यापुढेही विनाकारण संशयास्पद स्थितीत भटकणारावर सक्त कारवाई करण्यात येणार आहे असे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी आवाहन केले आहे.