पारोळा सिंधी पंचायत च्या वतीने अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की सिंधी समाजांचे महान स्वातंत्र सेनानी अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती पारोळा सिंधी पंचायत च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली अमर शहीद हेमु कालाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या वर्षी संपूर्ण भारतात पुर्ण बर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शहिद हेमु कालाणी यांची जयंती दि २३ मार्च रोजी साजरी करण्यात येते परंतु या वर्षी शहीद हेमु कालाणी यांच्या जन्मशताब्दी वर्ष असल्याने सिंधी समाजांच्या वतीने संपूर्ण वर्षभर हा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय सिंधु सभा च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे त्यानिमित्त पुर्ण बर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन होणार याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल येथे दिं,३१ मार्च रोजी संपुर्ण भारतातील सिंधी समाजांच्या लोकांना एका मंचावर उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले होते या भव्य दिव्य कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या सह मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच सिंधी समाजांचे एकमेव खासदार इंदौर मध्यप्रदेश येथील शंकर लालवाणी, राज्यसभा सदस्य महेश जेठमलानी, महामंडलेश्वर सांई हंसराज यांच्या सह अनेक राजकीय नेते समाजातील उद्योग पती समाजाचे साधु संत
समाजातील अधिकारी, नेते ,अभिनेते व समाजसेवी यांच्या सह देशभरातुन आलेल्या एक ते दीड लाख समाजातील नागरिक च्या उपस्थितीत अमर शहीद हेमु कालाणी यांच्या जन्मशताब्दी उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली याच पार्श्वभूमीवर पारोळा येथील सिंधी पंचायत च्या वतीने अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती आज दिं ३१ मार्च रोजी साजरी करण्यात आली याप्रसंगी शहरातील समाजातील लहान मोठ्यांनी अमर शहीद हेमु कालाणी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले याप्रसंगी जय झुलेलाल नवयुवक मंडळाच्या वतीने अमर शहीद हेमु कालाणी यांच्या जिवनावर प्रकाश ज्योत टाकत नवयुकांना या महान देशभक्त हेमु कालाणी यांची गाथा सांगितली याप्रसंगी समाजातील सर्व लहान मोठे मंत्र मुग्ध होऊन ऐकत होते यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.