आमदार अनिल भाईदास पाटील पाटलांच्या स्थानिक विकास निधीतून दिव्यांग बांधवाना मिळणार सहाय्यक साहित्य
25 फेब्रुवारीला अमळनेरात होणार तपासणी शिबीर
अमळनेर येथील विधानसभा मतदारसंघाचे आ अनिल भाईदास पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास निधी 2022-23 अंतर्गत मतदार संघातील दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्य वितरित करण्यात येणार आहे.
मतदारसंघातील दिव्यांगाचे सर्वांगीण शारीरिक पुनर्वसन होण्याच्या उद्देशाने सदर योजनेतून सर्व प्रकारचे सहाय्यक साहित्य, कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे आमदार उपलब्ध करून देणार आहेत.यात तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कर्णयंत्रे, कुबड्या, वॉकर, अंधकाठी, कृत्रिम पाय, कॅलीपर इ. उपलब्ध होणार आहे.
सदर योजनेतून लाभार्थीना लाभ मिळणेसाठी व पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 25 फेब्रुवारी शनिवार रोजी इंद्रभुवन, स्वामीनारायण मंदीराच्या मागे, स्टेशन रोड, अमळनेर येथे सकाळी 9.30 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आले आहे. तरी अमळनेर विधानसभा मतदार संघातील गरजू दिव्यांग व्यक्तींनी सदर तपासणी शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहनआमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
येताना ही कागदपत्रे आवश्यक-
तपासणी शिबिरास येतांना दिव्यांग प्रमाणपत्राच्या 4 झेरॉक्स प्रती, आधार कार्डच्या 4 झेरॉक्स प्रती आणि पासपोर्ट फोटो 4 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.