दि. १३ रोजी मुख्यमंत्री पारोळा येथे, ११५ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ…..कलम प्रहार न्यूज नेटवर्क पारोळा
शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिनांक 13 रोजी पारोळा येथे येत आहेत.
याबाबत जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी माहिती दिली की दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता एन इ हायस्कूलच्या ग्राउंड वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभा होत असून येथून विविध विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थित होत आहे.
या कार्यक्रमास ना. गुलाबराव पाटील, ना. गिरीश महाजन, ना. दादाजी भुसे, ना. दीपक जी केसरकर, ना. शंभूराजे देसाई, ना. डॉ. विजयकुमार गावित, ना. उदयजी सामंत, ना. अब्दुल सत्तार, ना. संदिपान भुमरे, ना. तानाजी सावंत यांचे सोबत जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शहराच्या जिव्हाळ्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या शुभारंभ, बरोबरच आधुनिक संयुक्त नाट्यगृह, जलतरण तलाव, फिश मार्केट व मटन मार्केट विकसित करणे, शहरातील विविध चौक सुशोभीकरण करणे व शहराच्या परिसरातील जोड रस्त्यांवर विद्युतीकरण करणे या कामाचा एकूण ११४ कोटी ७६ लाख एवढ्या रकमेचे कामे सुरू करण्यात येणार आहेत. तरी या शहर विकासाच्या बदलत्या इतिहासात चे आपण साक्षीदार व्हावे यासाठी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन अमोल पाटील यांनी केले आहे.