पारोळा तहसील लिपिकास शासकीय कामात अडथडा केलेने आरोपीस एक वर्ष कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सेशन कोर्ट अमळनेर यांनी ठोठावली-
सण -2016 मध्ये तहसील कार्यालय पारोळा येथील लिपिक श्री सुदाम शेणपडू महाजन यांना आरोपी नामे अनिल गंगाराम पाटील रा सुमठाणे ता पारोळा यांनी शासकीय कामकाजात व्यत्यय निर्माण करून मारण्याची धमकी दिलेने पारोळा पोलीस स्टेशन येथे दिलेले तक्रारीवरून कलम 353,506 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता,नमूद गुन्ह्याचा तपास हे कॉ 1574 प्रकाश रतन चौधरी तात्कालीन पारोळा पो स्टे यांनी तपास करून आरोपपत्र सादर केले असता एकूण सहा साक्षीदार तपासले असून सहाययक सरकारी वकील किशोर आर बागुल व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार उदयसिंग साळुंके यांनी कामकाज पाहिले असून अमळनेर सेशन कोर्ट क्र -एक श्री एस बी गायधने साहेबांनी एक वर्ष कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.