पारोळा पोलिसांनी तामसवाडी शाळेचा L E D टी व्ही चोरट्यास पकडून फिर्यादिस टी व्ही दिला परत-
फिर्यादी नामे किरण एकनाथ कुलकर्णी मुख्याध्यापक जि. प.केंद्र शाळा तामसवाडी यांचे शाळेतील 3 री च्या वर्गात लोकवर्गणीतून लावण्यात आलेला मर्फी कंपनीचा L E D टी व्ही हा अज्ञात आरोपीने चोरी केल्याचे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने आरोपीचा गुन्हे शोध पथकाचे पोना संदीप सातपुते, पोकॉ, राहुल कोळी पोकॉ, हेमचंद्र साबे अशांनी शोध घेऊन आरोपी रोहित संजय पाटील रा विचखेडा ता पारोळा जि जळगाव यास ताब्यात घेऊन त्याचे कडून गुन्ह्यातील गेला माल 9000/- रु किमतीचा L E D टी व्ही जप्त करण्यात आला असून मा JMFC के के माने पारोळा यांचे आदेशाने फिर्यादिस पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी L E D टी व्ही परत दिला आहे,नमूद गुन्ह्याचा तपास पो ना, प्रविण पारधी हे करीत आहेत.