पारोळा ….शहरास मोठा ऐतिहसिक वारसा असून राजे जहांगीर व राणी लक्ष्मी बाई यांचा इतिहास व काही दंत क था अनेक वर्षा पासून सर्वच पिढी ना एकण्यांस मिळत असतात. असाच एक प्रकार नुकताच दिसून आला आ चिमणराव पाटील यांच्या पुढाकाराने शहरात अनेक चौक सुशोभीकरण कामे सुरू आहेत यात आझाद चौक येथे सुरू असलेल्या कामा वेळी रस्ता खोदकाम अवघ्या 5 ते 7 फूट खाली खोदकाम करते वेळी मजुरांना अचानक एक मोठे भुयार मिळून आले सदर भुयार हे सुस्थितीत असून आतून बांधकाम केलेले आहे विशेष म्हणजे सदर काम हे 400 वर्षा पूर्वीचे असल्याचे काही इतिहास प्रेमींनी सांगितले तसे पारोळा येथील भुईकोट किल्ल्यात तब्बल तीन ते चार किमी अंतरा चे भुयार आजही असून याच भुयारी मार्गा ने राजे जहांगीर व राणी लक्ष्मी बाई यांनी इंग्रज सेने पासून बचाव केल्याचा इतिहास असताना आझाद चौक परिसरात नवीनच सापडलेल्या भुयारी मार्गाच्या बाबत पुरातन विभागाने अभ्यास करावा अशी मागणी होत होत आहे विशेष म्हणजे सदर भुयार हे आझाद चौकातील अनेक भागा पर्यंत असल्याची माहिती ह्या भागातील नागरिक करता आहे