मकर संक्रांतीपट कर्ते संजय लक्ष्मण पाठक यांनाडॉक्टरेट इन लिटरेचर ने सन्मानित.
पारोळा येथील बालाजी मंदिराचे पुजारी यांना. पं दिनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन(मथुरा)द्वारा विद्यावाचस्पती सारस्वत सन्मान
करण्यात आले.सदर पदवीदान समारंभ वेळी कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया,नवी दिल्ली येथे संपन्न झाला. असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेत विद्यापीठाच्या प्रबंध कार्यकारणीद्वारा महाराष्ट्रातून विभिन्न क्षेत्रातील विशेष कार्य असणाऱ्या ७ विद्वानांची निवड करण्यात आली. त्यात संजय लक्ष्मण पाठक यांची निवड करण्यात त्यांनी केलेली लक्षित – दुर्लक्षित कार्याचा विचार केला गेला.औपचारिक व अनौपचारिक शिक्षण, योग्यता, अनुभव, प्रतिवर्षी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर वितरित होणारे त्यांचे द्वारा लिखित मकरसंक्रांतीपट, अनेक मंदिरे उभारणीसाठी शास्त्रीय मार्गदर्शन, विविध ठिकाणी मूर्तींची चल व अचल प्राणप्रतिष्ठा विधी, केलेले यज्ञयाग, श्रीमद् भागवत व इतर पुराणे, संस्कृत पारायणासह कथा, कुळधर्म कुलाचार मार्गदर्शन, पारंपारीक पूजा अर्चन विधी ,तसेच महाविद्यालयात अध्यापन, वृक्षारोपण व संगोपन, समाजात आदर्श निर्माण होणे व टिकून राहणे तसेच महानुभावांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, देशभक्ती, विश्वकल्याणासाठी वैयक्तिक अनुष्ठान व इतर अनेक सामाजिक कार्ये ई. केलेली व करत असलेली विशेष कार्याची दखल घेवून विद्यावाचस्पती डॉक्टरेट हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
या समारंभास प्रमुख अतिथी..पद्मश्री डॉ. अरविंद कुमार जी माजी कुलगुरू राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय झाशी, माननीय डॉ. स्वर्णलता पांचाल जी, रिसर्च सायंटिस्ट, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) नवी दिल्ली, माननीय डॉ.इंदुभूषण मिश्रा जी, कुलगुरू पंडित. दिनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,माननीय सु.श्री. दीपा मिश्रा जी, सुप्रसिद्ध कथा वाचिका, वृंदावन धाम मथुरा, माननीय डॉ. विश्वनाथ पाणीग्रही जी, राष्ट्रीय पर्यावरणविद एवं वर्ल्ड रेकॉर्ड धारी, छत्तीसगढ इत्यादी सन्माननीय यांच्या या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते महापदवी वितरण समारंभ सोहळा पार पडला.
सदर संमनाबद्दल सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.