यावल येथून चोरलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी परत यावल पोलिसांना दिली –
दि 12/12/2022 रोजी यावल येथून चोरीस गेलेली मोटर सायकल भिलाली ता पारोळा शिवारात संत सोमगिर बाबा मंदिराजवळ गुन्हे शोध पथकाचे पो ना संदीप सातपुते,पो ना बापू पारधी,पो ना प्रवीण पाटील,पो कॉ अभिजित पाटिल, पो कॉ किशोर पाटील, पो कॉ राहुल पायील,पो कॉ आशिष पाटील शोध घेतला असता सदर मोटार सायकल ही यावल पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याची माहिती मिळाली त्यावरून यावल पोलिसांशी संपर्क करण्यात आला असता यावल पोलिस स्टेशनला गु र न 0472/2022 I P C 379 प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदरची मोटार सायकल हे कॉ नरेंद्र सीताराम बागुले नेम यावल पोलीस स्टेशन यांचे ताब्यात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली आहे.