अभिनव पूर्व व प्राथमिक विद्यामंदिर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा आज रोजी श्रीकृष्ण प्रतिष्ठान संचलित अभिनव पूर्व व प्राथमिक विद्यामंदिर पारोळा या शैक्षणिक संकुलात सकाळी ठीक ७:३० वाजता संस्थेचे अध्यक्ष भिमराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात

*अभिनव पूर्व व प्राथमिक विद्यामंदिर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा* आज रोजी श्रीकृष्ण प्रतिष्ठान संचलित अभिनव पूर्व व प्राथमिक विद्यामंदिर पारोळा या शैक्षणिक संकुलात सकाळी ठीक ७:३० वाजता संस्थेचे अध्यक्ष भिमराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे व्ही. एम. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक हिमांशू पाटील, शिक्षक , विद्यार्थी व पालक इ. उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष भिमराव पवार यांच्या हस्ते बिस्कीट चॉकलेट वाटप करण्यात आले यानंतर १ ते ७ चे विद्यार्थीनी विविध वेश पोशाख परिधान करून आले होते त्यात आराध्या गव्हाणे भारत माता , फाल्गुनी जगताप झाशीची राणी, चेतन पाटील पंडित नेहरू शौर्य ठाकूर भगतसिंग ,रुद्रा पाटील सावित्रीबाई फुले ,दिनेश मिस्तरी लाल बहादुर शास्त्री,व धनश्री पाटील आणि चेतन पाटील यांनी भाषण दिले, फाल्गुनी जगतापने ए वतन वतन मेरे… या गाण्याने वातावरण देशभक्तिमय झाले होते.कार्यक्रमाच्या शेवटी हॅपी रिपब्लिक डे या गाण्यावर डान्स केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल चौधरी मॅडम व आभार ईश्वरी चव्हाण यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top