पारोळा येथे भगवान महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा…

पारोळा येथे भगवान महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा…
पारोळा – पारोळा येथे १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात शासन नायक श्री भगवान महावीर यांचे जन्म महोत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला.
भगवान महावीर जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, या जयंती निमित्ताने पारोळा येथे सकाळी ६ वाजता भगवान महावीराच्या जय घोषनांनी प्रभात फेरी काढण्यात आली . तद्नंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे अभिषेक करुन पुजन करण्यात आले . सकाळी ९ वाजता हत्ती गल्लीतील जैन मंदिरा पासुन चांदीच्या रथात प्रतिमा विराजमान करुन शहरातुन ढोल – बॅन्डच्या गजरात महिलांनी दांडिया रास गरबा खेळत भगवान महावीरजीचा संदेश जिओ .. और .. जिने .. दो .., . , मानवी आहार शाकाहार … अश्या विविध घोषणांनी भव्य शोभायात्रा गणपती चौक , बालीजी चौक , गांव होळी , गुजराथी गल्ली , रथ गल्लीतुन काढण्यात आली, येथील जैन त्यागी भवन मध्ये शोभायात्रेची सांगता करण्यात आली . या शोभायात्रेमध्ये जैन ट्रस्टी , समाज बांधव भगिनी व तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , बापुराव पाटील , आदि सह पोलिस बंदोबस्त चोख होता
.
चौकट …..
भगवान महावीर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या रथा मध्ये महावीरजीची प्रतिमा विरजमान करण्यात आली होती . ठिकठिकाणी प्रतिमेची आरती करण्या साठी भाविकांनी एकच गर्दी केली होती .. रथा ला ओढण्यासाठी व आरतीचे पुजन करण्यासाठी भगवे वस्त्र परिधान केलेल्या ( सोहळ्या मधील ) यानाच परवानागी होती .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top